परळीचे लोक साधे सरळ, पण दोन लोकांमुळे…”, खासदार सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता या घटनेतील आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपपत्रात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. ‘परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला याचं काही आश्चर्य वाटत नाही. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला आहे. मला एकच प्रश्न आहे की या व्यक्तींची हिंमत कशी होते? त्यांना हा अधिकार कोणी दिला? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे त्यांच्या पाठिमागे कोणीतरी असल्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार कसा चालेल? हे दुर्देव आहे की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या पद्धतीने किंमत मोजावी लागली”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर नेमका राजीनामा का द्यावा लागला?

खासदार सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, “नैतिकतेची आणि त्यांची कधी भेटच झाली नाही. तसेच या प्रकरणाबाबत सुरेश धस म्हणाले तसं शिक्कामोर्तब होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? बीडमध्ये कोणती केस राहिली आहे? खूनाची घटना घडली, खंडणीची घटना घडली. शेतकऱ्यांची पीक विम्याची फसवणूक, शेतकऱ्यांची हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा घडला मग अजून कुठला गुन्हा करायचा राहिला आहे?”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

बीडमधील दहशत मोडून काढायचीय

“मी कधीही कोणावर खोटेनाटे आरोप करत नाही. ते माझं राजकारण देखील नाही. मात्र, आवादा नावाच्या कंपनीने जेव्हा तक्रार केली होती, तेव्हाच या आरोपींना आवरलं असतं तर हे प्रकरण घडलं नसतं. देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. बीडमध्ये जी दहशत आहे ती दहशत मोडून काढायची आहे. जर मंत्र्‍यांच्या पीएस आणि ओएसडींना कायदा आहे, तर आमदार आणि खासदारांनाही तोच कायदा असला पाहिजे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यात बदल घडू इच्छित आहेत, तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. दिल्लीत आम्हाला कोणी भेटलं तरी विचारतं की बीडच्या घटनेत काय झालं? परळीचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली आहे. दोन लोकांच्या कृतीमुळे राज्याचं नाव देशपातळीवर खराब झालं आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Related Posts

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती