Pune: कॅब चालकाचं धक्कादायक कृत्य, सिग्नलवर टॅक्सी थांबताच महिलेने घेतला पळ !

पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. आता आणखी एका महिलेला टॅक्सी प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागला.

21 फेब्रुवारी रोजी आयटी क्षेत्रात कार्यरत असणारी एका महिलेने आपलं काम संपवून रात्री घरी परततेवेळी कॅब बुक केली. सुरुवातीला प्रवास सामान्य वाटत होता. मात्र काही वेळातच कॅब चालक सुमित कुमार याने आरश्यामधून वारंवार तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट लक्षात येताच महिला घाबरली, मात्र प्रसंगावधान राखत तिने सिग्नलला गाडी थांबताच पटकन कॅबमधून बाहेर पडून पळ काढला. दोन किलोमीटर अंतर धावत ती थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत संबंधित अ‍ॅपमधून वाहन क्रमांक मिळवला आणि आरोपी सुमित कुमार याला अटक केली. मात्र, काही वेळातच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

या घटनांमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि कॅब सेवांमध्ये महिला सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाने या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावी, अशी मागणी नागरिक आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून होत आहे.

Related Posts

पुणे बलात्कार प्रकरण : आरोपी अटकेत, माहिती देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस जाहीर !

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता,…

स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेश

हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा पुणे – स्वारगेट (पुणे) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी महत्त्वाचे आदेश दिले. महामार्गांवरील खासगी…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती