मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी: नेतृत्वाची निःपक्ष तुलना

भारताच्या राजकीय नेतृत्वात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन महत्त्वाचे नाव आहेत. त्यांच्या कार्यपद्धती, निर्णय घेण्याची प्रक्रिया, आणि देशाला दिलेले योगदान यावर विविध चर्चा होत असतात. या दोघांच्या नेतृत्वाची तुलना करताना त्यांचे निर्णय, त्यांचा परिणाम, आणि लोकांशी संवाद साधण्याची शैली याचा अभ्यास आवश्यक आहे. 

मनमोहन सिंग हे त्यांच्या शांत, अभ्यासपूर्ण, आणि सहकारी दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. ते एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांच्या या कौशल्याचा उपयोग त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी केला. 2008 मध्ये जागतिक मंदीचा प्रभाव भारतावर कमी पडावा यासाठी त्यांनी योग्य आर्थिक धोरणं राबवली. भारत-अमेरिका अणु करार आणि माहितीचा अधिकार (RTI) कायदा हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय होते. त्यांनी आपल्या नेतृत्वाने देशाला आर्थिक स्थैर्य दिलं, पण त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला. त्यांच्या संवाद साधण्याच्या शैलीची मर्यादा होती; त्यांनी मोजक्या पत्रकार परिषदा घेतल्या, तसेच वेळोवेळी पत्रकार यांना प्रश्नांचे उत्तर ही देत गेले.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी आपली आक्रमक आणि प्रभावी नेतृत्व शैली प्रस्थापित केली. त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले, जसे की नोटाबंदी आणि GST लागू करणे. नोटाबंदीचा उद्देश आहे काळ्या पैशाचा नायनाट करणे आणि भ्रष्टाचारावर आळा घालणे होता, पण प्रत्यक्षात याचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं नाही. उलट, या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला, अनेक छोटे व्यवसाय बंद पडले, आणि लाखो लोक बेरोजगार झाले. GST चा उद्देश कर प्रणाली सुलभ करणे आणि देशाला एका आर्थिक यंत्रणेत बांधणे होता. परंतु, यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे…GST प्रणाली असून ही टॅक्स मध्ये अनेक प्रकार दिसत आहेत, ज्यामुळे व्यापारी वर्गातील नाराजी वाढली. 

स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आणि डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांनी समाजात सकारात्मक बदल घडवेल अशी अपेक्षा होती, पण त्यांची अंमलबजावणी अजूनही अनेक भागांमध्ये प्रभावीपणे होताना दिसत नाही. मोदींची संवाद साधण्याची शैली थेट आणि प्रभावी आहे. त्यांनी पत्रकार परिषदा घेण्याऐवजी “मन की बात” सारख्या कार्यक्रमांद्वारे जनतेशी थेट संपर्क साधला. परंतु, यामुळे लोकांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची पारदर्शकता कधीकधी प्रश्नांकित होते. स्वच्छता नावाखाली टॅक्स घेऊन अनेक मोठ्या शहरात जैसे थे स्थिती आहे.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात आर्थिक स्थैर्यावर भर दिला गेला, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आर्थिक सुधारणांच्या नावाखाली धाडसी प्रयोग करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या निर्णयांमध्ये दीर्घकालीन विचार दिसतो, तर नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमध्ये त्वरेने परिणाम साधण्याचा प्रयत्न दिसतो. 

या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पद्धतीने देशाची सेवा केली. परंतु, त्यांच्या धोरणांमुळे होणारे परिणाम भिन्न होते. मनमोहन सिंग यांचा अभ्यासू दृष्टिकोन देशासाठी स्थैर्यपूर्ण ठरला, तर नरेंद्र मोदी यांचा आक्रमक दृष्टिकोन देशाला वेगवेगळ्या पातळ्यांवर नवे आव्हानं आणि बदलांची अनुभूती देणारा ठरला. त्यांच्या निर्णयांमुळे देशाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे अनुभव मिळाले, ज्याचा अभ्यास भविष्यातील नेतृत्वासाठी मार्गदर्शक ठरेल.

जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, मुंबई

  • Related Posts

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    भारतीय लोकशाहीची जगभरात ओळख आहे – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमुळे. मात्र, हीच लोकशाही आज एक गंभीर संकटाचा सामना करत आहे. वाढती गुन्हेगारी आणि त्याचा थेट राजकारणाशी झालेला संबंध ही देशासाठी…

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    लातूर:मध्य रेल्वेच्या नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. गुजरात आणि दिल्लीसह इतर राज्यांमध्ये स्लीपर…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा