मढ-मार्वे रस्त्याचे धोकादायक काम प्रवाशांची प्रचंड गैरसोय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

मढ-मार्वे हा एक प्रमुख रस्ता असून, याच मार्गावरून लाखो प्रवासी व हजारो विद्यार्थी रोज प्रवास करतात. मढ, भाट्टी, येरंगळगाव, धारवलीगाव, अक्सागाव परिसरातील विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, S.Kumar Group – Shri Siddhi Kumar Infrastructure Pvt. Ltd. कंपनीने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट ठेवल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे धुळीचे मोठे ढग सतत हवेत पसरलेले दिसतात. शाळकरी मुले व प्रवाशांना श्वसनाचे विकार, सततचा खोकला आणि अस्वस्थता जाणवत आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या तब्येतीत झालेल्या घसरणीची माहिती पालकांना दिली आहे. बालवर्गातील मुलांचे आरोग्य गंभीरपणे बिघडत असल्यामुळे पालक प्रचंड चिंतेत आहेत.

प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वेळेत रस्ता मिळत नाही. एका पालकाने सांगितले की, “माझ्या मुलाची तब्येत बिघडली, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत एक,दोन तास गेला.

लहान मुलांचे हाल:

शाळेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांचे हाल अधिकच वाढले आहेत. मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. अनेक लहान मुलांनी लघवी रोखून ठेवणे, बस मध्येच करणे ,पोटदुखी, अशक्तपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेच्या बसचालकांनीही पालकांना याबाबत सतत माहिती देत आहेत…

वाहतूक नियोजन पूर्णपणे कोसळले आहे. शूटिंगसाठी येणाऱ्या गाड्या आणि अवजड वाहनांवर कोणतेही नियंत्रण नाही. प्रशासनाकडे वाहतूक वॉर्डनची संख्या कमी असून, त्यांना पगार वेळेवर दिला जात नसल्यामुळे अनेक कर्मचारी कामावर येत नाहीत. “कर्मचाऱ्यांकडे वॉकी-टॉकी सारख्या मूलभूत साधनांचीही कमतरता आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
मढ-मार्वे हा प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा मार्ग असल्यामुळे येथील पर्यटकही प्रचंड त्रस्त झाले आहेत. ट्रॅफिकमुळे प्रवासाचा आनंद हिरावला जात आहे, तर टॅक्सी आणि ऑटो रिक्षांचे भाडे या वाहतुकीमुळे चौपट वाढत आहे. स्थानिक व्यावसायिकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची माहिती अक्सा बीच वरील काही विक्रेत्यांनी दिली..

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “प्रशासनाला मोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का?”असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या S.Kumar Group – Shri Siddhi Kumar Infrastructure Pvt. Ltd. कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पालकांनी लावून धरली आहे. “आमच्या मुलांच्या जिवाशी खेळ थांबवा अशी पालकांनी ही प्रशासन,लोकप्रतिनिधी यांना विनंती केली आहे..

जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव,मालाड,मुंबई

  • Related Posts

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ चर्च ते मढ जेट्टी हा मुख्य रस्ता सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने स्थानिक रहिवासी, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. S. Kumar Group – Shri…

    वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी (कोस्टल रोड) प्रकल्पाला गती देण्याची तयारी – केंद्रीय मंत्री पियूष गोयल

    मुंबईतील वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा