
जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. विशेषतः मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर अपक्ष उमेदवारांच्या अर्ज भरण्याची संख्या अधिक झाली होती.
४१ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांची माघार
या मतदारसंघात एकूण ४१ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु, या ४१ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांनी आज अर्ज माघार घेतला असून, आता फक्त १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्या उमेदवारांची नावे
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे: प्रेक्षा भांबळे, साहेबराव कदम, अंकुश राठोड, प्रदीप उर्फ बाळासाहेब काजळे, खंडेराव आघाव, पुष्कराज देशमुख, बालाजी शिंदे, राजेश भिसे, विजय चव्हाण, शरद चव्हाण, समीर दुधगावकर, ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर नुरा राठोड, अमृता नागरे, पांडुरंग कदम, प्रसाद काष्टे, कृष्णा पवार, स्वाती नखाते, दिनकर गायकवाड, सुखदेव सोळुंके, अमोल सरकटे, विष्णू ढोले, अनिल अंभोरे, गणेश काजळे.
उद्या पासून प्रचाराची सुरुवात
या घटनेनंतर जिंतूर सेलू मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी उद्या पासून सुरू होणार आहे. या निवडणुकीत १७ उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी तयारी चालू केली आहे, आणि प्रत्येक उमेदवार आपला मुद्दा मांडण्यासाठी जोरदार प्रचार करणार आहे.